कुटुंब - आजचे आणि उद्याचे - लेख सूची

कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग १)

परिपूर्ण स्त्रीमुक्तीच्या संकल्पनेला जो विरोध होत आहे त्याचे मुख्य कारण, माझ्या समजुतीप्रमाणे, त्याचा परिणाम कुटुंबविघटनामध्ये होईल अशी भीती आम्हाला वाटते; हे आहे. म्हणून जी आमची कुटुंबे आम्ही प्राणपणाने जपत आहोत त्यांचे खरे स्वरूप कसे आहे ते पाहू. त्यासाठी आपणाला कुटुंबाची शास्त्रशुद्ध व्याख्या करण्याची गरज नाही. पण साधारणपणे असे म्हणता येईल की कुटुंबामध्ये एका घरात राहणारे, …

कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग २)

आतापर्यंत (मागच्या अंकामध्ये) मी माझी काही निरीक्षणे नोंदवली, तशीच आणखी काही पुढे मांडतो. आपल्या भारतीय कुटुंबामध्ये कुटुंबीयाविषयीच्या सर्व जबाबदाच्या फक्त त्या कुटुंबाच्या सदस्यांनीच पेलावयाच्या आहेत असे आपल्याला वळण असल्यामुळे मुलामुलींचे शिक्षण करणे, त्यांना नोकर्याय मिळवून देणे, त्यांची लग्ने लावून देणे अशा जबाबदारीच्या कामांमध्ये कुटुंबाबाहेरचे लोक एकमेकांना मदत करीत नसतात. उलट ते एकमेकांच्या मार्गात अडथळे निर्माण …

कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग ३)

आपल्या भारतीय नागरित समाजामध्ये कुटुंबाची किंवा कुटुंबप्रमुखाची मुख्य जबाबदारी त्रिविध आहे हे आपण जाणतो. ती म्हणजे (१) मुलांचे आणि नातवंडांचे शिक्षण करणे, (२) त्यांना नोकरी लावून देणे व (३) त्यांची शक्य तितक्या थाटामाटात लग्ने लावून देणे ही होय. बाकीच्या सगळ्या जबाबदार्या( ह्यांच्यापुढे गौण किंवा तुच्छ मानल्या जातात. त्या जबाबदार्यांसमुळे पर्यायाने त्यांसाठी बसविलेल्या आपल्या समाजाच्या घडीमुळे …